कजगाव, ता भडगाव, प्रतिनिधी । येथे आज श्री विश्वरचिता भगवान श्री विश्वकर्मा जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.
यानिमित्त सकाळी श्री विठ्ठल मंदिर ते सावता महाराज मंगल कार्यालय पर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली , व प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले , यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते , यसस्वीतेसाठी श्री विश्वकर्मा समाजाचे अध्यक्ष विनोद हिरे , शामकांत हिरे , कमलाकर हिरे, उत्तम मिस्तरी, वाल्मिकी हिरे , सुनील मोरे , ईश्वर हिरे ,धर्मराज हिरे , भिकन हिरे ,राकेश हिरे ,राजाराम मोरे, बापू मोरे ,ज्ञानेश्वर हिरे ,दादू मोरे, भारत मोरे, राहुल मोरे ,मयुर अहिरे ,विजय मोरे, किरण हिरे, सचिन मोरे ,भैया मोरे ,पवन हिरे , व सर्व समाज बांधव उपस्थित होते