औषधनिर्माणशास्त्र विभाग, शासकीय तंत्रनिकेतन येथे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

0
9

जळगाव, प्रतिनिधी । शासकीय तंत्रनिकेतन मधील औषधनिर्माणशास्त्र विभागात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या पत्नी डॉ. अनुराधा राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या डॉ. अमृता मुंडे, डॉ. जयश्री चौधरी (स्त्रीरोग तज्ञ) मान्यवरांच्या हस्ते औषध माहिती केंद्राचे द्वितीय आरोग्य बुलेटिन “नवजात शिशुची काळजी: पहिले २८ दिवस” चे प्रकाशन करण्यात आले.

ह्यात नवजात बाळाच्या आरोग्य समस्या, नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी व त्यांच्या बालसंगोपनासाठी काही महत्वपूर्ण टिपा ह्याबद्दलची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. ह्याच दरम्यान उपस्थितीत विविध औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण मान्यवरांच्याहस्ते औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या परिसरात करण्यात आले. हे सर्व औषधी वनस्पती “झाडांची भिशी ग्रुप -१” यांनी उपलब्ध करून दिले. त्याच बरोबर औषधनिर्माणशास्त्र विभागातील औषध माहिती केंद्र (ड्रग इन्फर्मेशन सेंटर) केंद्रामार्फत विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, पालक, फार्मसिस्ट, आरोग्य सेवा व्यवसायिक आणि सामान्य जनता यांना औषधांची व आरोग्य विषयी माहिती प्रदान करून जनजगृती करण्यात आली.

सदर कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ. पराग पाटील, विभागप्रमुख डॉ. प्रशांत अरगडे, डॉ. पी. पी. चौधरी, के. पी. वानखेडे, ए. एस. झोपे, के. पी. अकोले, डी. एम. पाटील, सी. पी. भोळे, एच. के. नेमाडे, डॉ. विवेक काहाळे, डॉ. चैताली पवार, ईश्वर प्रसाद रीतापुरे, राकेश दौडे व विभागातील प्राध्यापक इतर कर्मचारी उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमाचे समन्वयक रीतापुरे व औषध माहिती केंद्राचे समन्वयक दौडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here