ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे – प्रदिप निकम

0
52

चाळीसगाव, प्रतिनिधी । ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी आज पासून चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर चाळीसगाव नगरपालिकाचे माजी उपनगरअध्यक्ष प्रदिप निकम यांनी आमरण उपोषण दिनांक १६ डिसेंबरपासून सुरू केले आहे.

उपोषण कर्ते हे मराठा समाजाचे असून इतर मागासवर्गीय प्रवर्गात येतात इतर मागासवर्गीय प्रवर्गाची संख्या व इतर प्रवर्गाची संख्या पाहता महाराष्ट्र शासनाने निवडणूक प्रकियेत लढवन्यकामी इतर मागासवर्गीय प्रवर्ग आरक्षणाची तयारी केलेली होती सदरचे आरक्षण हे होत नसून त्यामुळे निवडणूक लढवितांना आमचे स्वतःचे व इतर मागासवर्गीय प्रवर्गाची जागा नसेल त्यामुळे आमचे कधीही न भरून निघणारे नुकसान होईल
संविधानातील तरतुदींचे अनुषंगाने प्रत्येक मागास वर्गास आरक्षण दिलेले आहे सदरचे आरक्षण हे त्या त्या वेळेचे तरतुदीचे अनुषंगाने असलेल्या लोकसंख्याच्या पटीनुसार आहे उपोषण कर्ते देखील इतर मागास प्रवर्गात मोडतो तथापी इतर मागासवर्गीय प्रवर्गास कुठल्याही प्रकारचे आरक्षण दिलेले नाही उर्वरित मागासवर्गीय यांना आरक्षण दिलेले असून व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण न देणे हा आमच्यावर झालेला अन्याय आहे त्यामुळे सदरचा निर्णयात बदल करण्यात येऊन आम्हास मतदान प्रकिर्येत भाग घेऊन निवडणूक लढवन्याकामी इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे आरक्षण द्यावे येणाऱ्या सात दिवसाच्या आत मतदान प्रकिर्येत आणि निवडणूक प्रक्रीयेत इतर मागासवर्गीय आरक्षण बाबत निर्णय घेण्यात आला नाही तर सात दिवसानंतर प्रदिप निकम यांनी आत्मदहनचा इशारा चाळीसगाव तहसीलदार यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here