Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»एरंडोल»एरंडोलात महिलेवर विळ्याने वार
    एरंडोल

    एरंडोलात महिलेवर विळ्याने वार

    SaimatBy SaimatMarch 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल : प्रतिनिधी
    येथील गजमल नगरात किरकोळ कारणावरून भांडण झाल्यामुळे तीन महिला व एक पुरुषाने मिळून एका महिलेच्या डोक्यावर विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना 22 मार्च घडली होती. गंभीर जखमी महिलेवर जळगाव येथे उपचार सुरू आहे. जखमी महिलेने दिलेल्या जबाबानुसार 23 मार्च रोजी एरंडोल पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
    याबाबत सविस्तर असे की, गजमल नगरात आशाबाई दत्तात्रय चौधरी (वय 45) ही महिला पती व दोन मुलांसह राहते. 22 रोजी महिलेचे पती दत्तात्रय चौधरी हे बकरी बांधण्यासाठी जात असतांना, त्यांच्या घरासमोरील मनिषा सपकाळे, ममता सपकाळे, मोना सपकाळे व दीपक मेहराळे यांनी आशाबाई व त्यांच्या पतीला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारल्यावर तिघांनी आशाबाईंना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच घरातून विळा आणून आशाबाई चौधरी यांच्या डोक्यावर वार केला. तसेच चौघांनी मिळून मारहाण केली. आशाबाई चौधरी गंभीर जखमी झाल्यामुळे बेशुद्ध झाल्या. शेजाऱ्यांनी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून त्यांना जळगावला हलवले. जखमी आशाबाई चौधरी यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon:जळगाव शासकीय वसतिगृहात तरुणाचा गळफास घेऊन मृत्यू

    March 17, 2026

    Pune Crime : पुणे वाघोलीत चहा पिताना तरुणावर जीवघेणा कोयता हल्ला; आरोपी अटक

    March 16, 2026

    Jalgaon : जळगाव पोलिसांच्या गोपनीय माहितीतून मालेगाव टोळीचा पर्दाफाश

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.