एनसीबीची मोठी कारवाई : एरंडोल येथे १५०० किलो गांजा जप्त

0
30
एनसीबीची मोठी कारवाई : एरंडोल येथे १५०० किलो गांजा जप्त

जळगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्ज प्रकरण सुरू असतांना आता जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुका येथे एनसीबीच्या पथकाने धडक कारवाई करत १५०० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील एरंडोल येथे एनसीबीचे पथकाला गोपनिय माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी ट्रकमधून वाहतूक करतांना १५०० किलो गांजाची पोती जप्त करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या विखाशापट्टणम येथून हा गांजा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. यात दोन जणांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही संशयित आरोपी हे आंध्र प्रदेशातील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here