जळगाव : येथील ईकरा शिक्षणं संस्था संचलित एच जे थीम कॉलेज कॅम्पसमध्ये 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इकरा शिक्षण संस्थे चे उपाध्यक्ष तसेच एच.जे थीम कॉलेज चे चेअमन डॉ. इकबाल शाह,यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी ईकरा संस्थेचे डायरेक्टर डॉ.जबिअल्ला शाह , कॉलेज चे प्रभारी प्राचार्य, इब्राहिम पिंजारी , उप प्राचार्य , युसुफ पटेल, ईकरा हजी गुलाम नबी आय. टी.आय चे प्राचार्य जुबैर मलिक, प्राध्यापक,बंधू भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
ईकरा शिक्षण संस्थेचे ऊपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह, यांनी ध्वजारोहणानंतर उपास्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्रजासत्ताक दिना चे महत्व पटउन दिले.महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. चांदखा यांनी संपूर्ण कार्यक्रमा चे आयोजन साठी परिश्रम घेतले.