मलकापूर(सतीश दांडगे) : येथील एचडीएफसी बँकेचे कॅशीयर वैभव रमेश देशमुख वय 30 वर्ष यांनी पोलीस स्टेशनला येवुन माहिती दिली की , दि. 21/02/2022 रोजी दुपारी 2.30 वा दरम्यान इरफान हनीफभाई पटनी मुळ रा.सुमरा सोसायटी रामनगर , गोंदल राजकोट गुजरात सद्या वडनेर भोलजी हा इसम एचडीएफसी बँक शाखा मलकापुर येथे कॅश भरणा करण्यासाठी गेला व बोहरा इंडस्ट्रीयल ऑईलचे अकाउंटवर भरणा करण्यासाठी स्लिप भरुन रक्कम कॅशीयरकडे दिली . कॅशीयरने नोट सॉरटींग मशीन मध्ये सदर इसमाने दिलेल्या 2000 , 500 , 200 व 100 रुपये दराच्या नोटा काउंट करीत असतांना 500 रुपये दराच्या नोटापैकी 38 नोटा रिजेक्ट बॉक्समध्ये आल्याने सदर नोटा त्यांनी चेक केल्या असता त्याची पेपर कॉलीटी खराब , हलक्या दर्जाची व नोटामधील आरबीयआयचा सिंबाल असलेला तार दिसुन आला नाही . सदर नोटा नकली असल्याबाबत कॅशीयरने इरफान पटनी यास सांगुन त्या कोठुन आणल्या असे विचारले असता त्याने माझा पार्टनर शेख वसीम शेख सलीम आम्ही सोबत काम करतो , तुम्ही मला त्या नोटा परत दया मी त्या बदलुन आणतो असे म्हणाला परंतु कॅशीयरने त्यास बनावट नोटा परत देता येत नाही , पोलीस स्टेशनला एफआयआर होईल असे सांगीतले . त्यानंतर कॅशीयर वैभव रमेश देशमुख यांनी आज 23 रोजी पोलीस स्टेशनला येवुन इरफान हनीफभाई पटनी मुळ रा . सुमरा सोसायटी रामनगर , गोंदल राजकोट गुजरात ह.मु.वडनेर भोलजी व बोहरा इंडस्ट्रीयल ऑईलचे अकाउंटधारक शेख वसीम शेख सलीम रा.नुरानी मस्जीद , सजनपुरी , खामगाव यांनी 500 रुपये दराच्या बनावट 38 नोटा एकुण 19,000 रुपये मुल्याच्या खऱ्या म्हणुन जवळ बाळगुन एचडीएफसी बँके मलकापुर शाखेत भरणा केल्यामुळे त्यांचेविरुध्द कलम 489 ( ब ) . ( क ) भा.द.वि.प्रमाणे कायदेशिर कार्यवाही होणेसाठी फिर्याद दिली आहे.सदर फिर्यादवरुन पो.स्टे . मलकापुर शहर येथे अप.नं. 90/2022 कलम 489 ( ब ) ( क ) भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे . गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि स्मिता म्हसाये करीत आहे.