आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

0
12
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उध्दभवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. या क्षेत्रातील संसाधनांमधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा, याकरिता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारव्दारा प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण 3.0” योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील एकूण 150 बेरोजगारांना शासकीय आर्युवेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून हे प्रशिक्षण ऑन जॉब ट्रेनिंग स्वरुपाचे असेल. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षित उमेदवारांना शासनातर्फे प्रमाणपत्र प्राप्त होणार असून त्यान्वये त्यांना आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारानी खालील गुगल लिंक वर आपली माहिती/नोंदणी ऑनलाईन सादर करावी. नोंदणी करताना समोर नमूद शैक्षणिक पात्रतेनुसार कोर्स/जॉब रोल निवडावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 0257-2959790 वर संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता श्री. वि. जा. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here