आरपीआयच्यावतीने आज जळगावात महापालिकेसमोर आंदोलन (व्हिडिओ)

0
12

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेने मूल्यांकनमध्ये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.

त्यात प्रमुख मागणी शहरातील रस्त्याची अक्षरश चाळणी झाली असून दैनंदिन स्वच्छता चांगल्या शाळा मिळाव्या गटारी साफ कराव्या, अशा विविध मागण्यांच्या संदर्भात आज पक्ष्याचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, कार्याध्यक्ष सागर सपकाळे, सचिन अडकमोल, महानगर उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, जेष्ठ नेते यशवंत घोडेस्वार, बबलू शिंदे, नरेंद्र मोरे, भिमराव सोनवणे, अनिल लोंढे, संदीप तायडे, अक्षय मेघे, हरीश शिंदे, शांताराम अहिरे, मनोहर इंगळे, चंद्रकांत खरोटे, जुलाल बाविस्कर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत होता. यावेळी घोषणाने परिसर दणाणून सोडला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here