आजपासून इयत्ता बारावी परीक्षेची आवेदनपत्रे स्वीकारली जाणार

0
6

मुंबई, वृत्तसंस्था । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार, १२ नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्रे भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ‘सरल’ डाटाबेसवरून नियमित शुल्कासह १२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत भरावयाची आहेत, तर उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार, ३ डिसेंबर ते ११ डिसेंबर २१ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने भरावयाची आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here