अवैध गौणखनिज प्रकरणी गुन्हे दाखल होणार – जि. प. सीईओ

0
29
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

जळगाव, प्रतिनिधी । बनावट पावत्यांच्या आधारे जिल्हा परिषदेच्या ठेकेदारांनी अवैध गौणखनिजाचा वापर केल्या प्रकरणी अखेर जि.प. सीईओंनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

जळगावसह पाचोरा, भडगाव आणि एरंडोल या तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या कामांसाठी १४ ठेकेदारांनी रॉयल्टी न भरता बनावट पावत्यांच्या वापर करून शासनाला चुना लावल्याचे हे प्रकरण जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणात शासनाची तब्बल ६३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचे पुरावे त्यांनी सादर केले आहेत.

या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यात १४ ठेकेदारांचा समावेश असल्याने जि.प. मध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. यासोबत लघुसिंचन विभागातील काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर देखील कारवाईची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here