अरेच्या.. माझ्या पुढे मागे करणारे आता मला विचारतात 30 वर्ष तुम्ही काय केल? एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

0
11

जळगाव :- प्रतिनिधी   बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. खडसे यांच्यासोबत भाजप नेते गिरीश महाजन, शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनीही निवडणुकीसाठी युद्धपातळीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बोदवड येथे झालेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला.

कोण कुठे होते माझ्यापुढे शेपटी हलवणारे मागेपुढे फिरणारे आणि तेच आता मला विचारतात तीस वर्षात तुम्ही काय केलं? टपरीवर फिरणाऱ्याला मी मंत्री बनवलं, पक्षाचा आशीर्वाद असला तरी माझ्या शब्दाला मान होता, असे म्हणत खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना खडेबोल सुनावले आहे.

पारधी पासून ते धरणगाव रस्ता मी केला जामनेर मतदार संघात सर्व धरणाचे काम कोणी केलं. भाऊ गुलाबराव, तुमच्या तालुक्यात अंजली धरण मी बांधला हो तरी विचारता तीस वर्षात तुम्ही काय केलं, अशा शब्दात खडसे यांनी पाटील यांना धारेवर धरले.

दरम्यान बोदवड नगरपंचायतीवर वर्चस्वी कुणाचे असणार? हे तर निवडणुकीअंतीच स्पष्ट होणार आहे मात्र, नेत्यांनी आपापल्या परीने फिल्डींग लावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here