अमेरिकेतील कॅलिफोर्नियात विमान घरावर कोसळलं, 2 जणांचा मृत्यू (व्हिडिओ)

0
19
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात विमान घरावर कोसळलं, 2 जणांचा मृत्यू (व्हिडिओ)

कॅलिफोर्निया, वृत्तसंस्था । अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात सोमवारी एक मोठा विमान अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक विमान कॅलिफोर्नियातील घरांवर कोसळलं आहे. या अपघातात एका शाळेच्या इमारतीलाही नुकसान झालं आहे.

कॅलिफोर्निया राज्यात एक जुनं विमान रहिवासी भागात कोसळलं. हे विमान कोसळताच घराला आग लागली. हा अपघात लॉस एंजेलिसच्या सँटी शेजारील सँटाना हायस्कूलजवळ झाला. या अपघातात किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच अग्निशामक दल आग विझवण्यासाठी पोहोचले.

रिपोर्ट्सनुसार, दोन इंजिनचे सेस्ना 340 विमानाने अॅरिझोना येथून उड्डाण घेतली होती. उड्डाण घेतल्यानंतर हे विमान लॉस एंजेलिस भागातील रहिवासी भागात कोसळलं. घरावर कोसळण्यासोबतच विमानाने एका ट्रकलाही धडक दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here