अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांसह शिक्षकही संभ्रमात

0
3

जामनेर : पंढरीनाथ पाटील
एरव्ही इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल जून महिन्यात जाहीर होऊन त्यानंतर अनुक्रमे अकरावी आणि बारावीनंतरच्या प्रवेश प्रक्रियांची सुरुवात होते.विशेषत: बारावीच्या निकालानंतर अभियांत्रिकी,वैद्यकीय,वैद्यकशास्त्र,एल .एल.बी व आर्किटेक्चर सारख्या अभ्यासक्रमांची सीईटी होते. जेईई व नीट या सारख्या केंद्रीय पातळीवरील परीक्षा होतात.मात्र यंदा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्याने तर बारावीच्या परीक्षा ही पुढे ढकलण्यात येणार असल्याने पुढील वर्षातील शैक्षणिक कॅलेंडर कोलमडून पडण्याची भीती विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात निर्माण होत आहे.
यंदा मार्च महिन्यापर्यंत चाललेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला ही पुढील वर्षी असाच फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासावर होण्याची भीती पालकांना आहे.शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू होतांना अभ्यासक्रम कसा वेळेत पूर्ण करणार, असा प्रश्न शिक्षकासह प्राध्यापक मंडळी उपस्थित करीत आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या मे किंवा जून महिन्यात घेण्यात येणार असल्याने त्याचा निकाल प्रचलित पद्धतीनुसार ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये अपेक्षित आहे. नेहमीच्या पदवी प्रवेशाच्या शैक्षणिक वेळापत्रकाचा अंदाज घेतल्यास तोपर्यंत निम्म्याहून अधिक प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली असते.मात्र यंदा ती सुरूच सप्टेंबरमध्ये होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्य सीईटी परीक्षांचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या वेळा पत्रकाप्रमाणे बदलले तरी जेईई,नीट सारख्या केंद्रीय प्रवेश प्रकियांचे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.इयत्ता दहावी व बारावीच्या लेट परीक्षांचा फटका केवळ पदवी परीक्षांनाच नव्हे तर आय.टी.आय,पॉलिटेक्निक अश्या अभ्यासक्रमांना ही बसेल. त्यामुळे एक तर शासनाने प्रवेश प्रक्रियांसाठी एकच धोरण राबवण्याचा निर्णय घ्यावा.अन्यथा शैक्षणिक राज्य मंडळाच्या परीक्षांना विलंब झाला तरी त्याचे प्रवेशाचे शैक्षणिक कॅलेंडर बिघडणार नाही त्याची काळजी घ्यावी असे मत प्राध्यापक व्यक्त करत आहे.
कृती आराखडा तयार करणे आवश्यक
शिक्षण विभाग,उच्च तंत्रशिक्षण विभाग आणि शिक्षणतज्ञ यांनी या सर्व घोळांवर एकत्रित तोडगा काढणे आवश्यक असल्याचे मत सध्या पालक वर्गातून व्यक्त केले जात आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षा नियोजनानुसार वेळेवर झाल्याचं तर ऑनलाईन मुल्यांकत,निकालाचा कालावधी, प्रवेश प्रक्रियेचा कालावधी यात कपात करून शैक्षणिक वर्ष सुरळीत करता येते का ? यावर अभ्यास व आताच कृती आराखडा तयार करणे आवश्यक असल्याने मत पालकासह शिक्षण तज्ञांकडून मांडले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here