अनिल देशमुख्यांच्या अडचणी वाढल्या, ED कडून निकटवर्तीयांच्या घरावर छापे

0
4

नागपूर : 100 कोटींच्या वसुली प्रकरणात अडचणीत आलेले राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मंगळवारी आणखी वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालयाने (ED) गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्या तीन निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकून झडती सुरू केली आहे. शिवाजी नगरातील सागर भटेवरा, सदर येथील सुमित आयझॅक यांच्यासह जाफर नगरातही आणखी एका ठिकाणी इडीच्या टीमकडून झाडाझडती सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

भटेवरा आणि आयझॅक हे अनिल देशमुखांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार मानले जातात. याची कुणकूण लागल्यानंतर इडीने हा छापा टाकल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या टीम या संदर्भातील कागदपत्रे खंगाळत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या विरोधात प्राथमिक तपास करून त्या आधारावर 21 एप्रिलला सीबीआयच्यादिल्ली येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात महाराष्ट्रातील अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

याच आधारावर या विरोधात गुन्हाही दाखल झाला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांना याप्रकरणी लवकरच चौकशी करता पाचारण केले जाण्याची शक्यता बळावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here