जळगाव : प्रतिनिधी
गेल्या 52 वर्षापासून सार्वजनिक जीवनात काम केलेल्या अडकमोल परिवार यांचे सार्वजनिक,समाजिक काम पाहता त्यांना राजनंदिनी महिला संस्था जळगावकडून सन 21-22 साठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांना समाजभुषण पुरस्कार महापौर जयश्रीताई महाजन व उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे, डॉ.मिलिंद बागूल, हैदर तडवी,ईश्वर मोरे,सौ.संदिपा वाघ,ज्ञानेश्वर वाघ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.यावेळी अनिल अडकमोल यांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्य देऊन सन्मान करण्यात आला.सत्काराला उत्तर देतांना अनिल अडकमोल यांनी सांगितले की, गेल्या 50 वर्षापासून अडकमोल परिवार हा सामाजिक,राजकीय जीवनात योग्यरित्या काम करीत आहे त्यात प्रमुख्याने शहरातील समतानगर ही वस्ती वसवून याठिकाणी सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविदाने राहतात. सर्वसामान्यांना योग्य न्याय मिळावा म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे शहरात लोकहितार्थ विविध उपक्रम राबवण्यात आले. याप्रसंगी आरपीआयचे मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे,नरेंद मोरे, किरण अडकमोल, अनिल लोंढे, संदीप तायडे, आकाश पाटील, भीमराव सोनवणे आदींनी अनिल अडकमोल यांचे अभिनंदन केले. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्यने उपस्थित होते.पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल अडकमोल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.