यावल, प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या अतिरीक्त साठवण तलावाच्या बांधकामात पावणदोन कोटी रुपयाच्या भ्रष्टाचार गैरप्रकार आणि अपहाराच्या आरोपाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी येथील तालुका भाजपाच्या वतीने बुधवार दि.29 रोजी येथील भाजपा शहर कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेतुन केली आहे. नगराध्यक्षा सौ.नौशाद मुबारक तडवी यांनी दोन दिवसापुर्वी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेवुन त्यांचेकडे यावल नगरपालिकेने उभारलेल्या अतिरिक्त साठवण तलावाचे कामात 1 कोटी 80 लाख रुपयाचा अपहार केल्याची लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली. या नगराध्यक्षांनी केलेल्या या भ्रष्ठाचाराच्या चौकशी मागणीस6 भाजपाने समर्थन करीत घडलेल्या या भ्रष्ठाचाराचा जाहीर निषेध करून भाजपने या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.
येथील शहर भाजपा कार्यालयात दि.29बुधवार रोजी दुपारी1वाजता भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष बाळू फेगडे, स्वीकृत नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे,शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, गोपालसिंह पाटील,पी.एस. सोनवणे यांनी संयुक्तिक घेतलेल्या पत्रकार परिषदेत गेल्या पाच वर्षांत शहराचा कोणताही गुणात्मक विकास न करता सर्वानुमते केवळ विकासाचा गवगवा केल्याचा आरोप करत पालिकेने नव्याने उभारलेल्या साठवण तलावाचे कामात1कोटी 80लाखाचा अपहार केल्याचा आरोप खुद नगराध्यक्षा सौ. नौशाद तडवी व इतर पाच नगरसेवकांनी केल्याची तक्रार केली असल्याने सर्व सामान्य जनतेत मोठा संशय व्यक्त करण्यात येत आहे.आतापर्यंत यावल शहराच्या विविध झालेल्या विकास कामात सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित असल्याचा देखावा केला गेला. कोण कोण एकत्र कशामुळे होते आणि आहेत हे यावलकरांना चांगल्याप्रकारे ठाऊक आहे)मात्र मागील काही दिवसांपासुन त्यांच्यात गटबाजी झाल्याने आणि अंतर्गत कलहामुळेच अपहाराची बाब चव्हाट्यावर आली असल्याचेही याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना सांगण्यात आले. साठवण तलावाचे जागेचे मोजमाप न करणे, मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे,आराखड्यानुसार काम न करणे,कंत्राटदारास तात्काळ 95% बिल अदा करणे यामुळे अतिरिक्त साठवण तलाव बांधकामात भ्रष्टाचार गैरप्रकार झाल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.साठवण तलावाच्या लगतच असलेल्या राकेश जगन्नाथ पाटील व पराग जगन्नाथ पाटील या दोन्ही बंधूची जमीन अतिक्रमित करून पालिकेने त्यावर साठवण तलाव उभारल्याने व शेतकरी बंधू याप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याने पालिकेला न्यायालयीन लढ्यासाठी सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकास निधी हा जनतेचा पैसा असून यात झालेल्या अपहार सारख्या गंभीर प्रकरणाचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध ही व्यक्त केला आहे.
यावेळी नगरपरिषदेतील भ्रष्टाचार गैरप्रकाराबाबत पहिली पत्रकार परिषद घेण्यात आल्याने यावल नगरपालिका राजकारण चांगलेच तापणार असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत तसेच ‘ऊट’अब आया है ‘पहाड’ के नीचे असे बोलले जात असल्यामुळे जिल्हाधिकारी जळगाव,मुख्याधिकारी यावल यांनी गैरप्रकार भ्रष्टाचारास खतपाणी न घालता आलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करून दोशी ठेकेदारांवर वेळ पडल्यास संबंधित यंत्रणेतील जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी असे यावल शहरात बोलले जात आहे.