नागपूरः वृत्तसंस्था
मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक-दीड वर्षांपासून सांगतोय की,त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा.माझ्यासमोर वरळीतून लढावे अन्यथा मी त्यांच्याविरुद्ध ठाण्यातून लढायला तयार आहे, असे थेट आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.
बोरवली-विरार या रेल्वेसाठी काही कांदळवन हलवायचा प्रयत्न होत आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची मला माहिती मिळाली. विशेष म्हणजे हे कांदळवन गडचिरोलीला हलविणार असल्याची माहिती आहे. हे तर जखम मांडीला आणि मलम शेंडीला, असा टोला त्यांनी लगावला.