एमपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी तरुणाने प्यायले महिलेचे पाय धुतलेले पाणी

0
22

पुणे : प्रतिनिधी

सुसंस्कृत म्हणवल्या जाण्याऱ्या पुण्यामध्ये भोंदूगिरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी एका तरुणाला महिलेचे पाय धुतलेले पाणी प्यायला दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या सगळ्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.या तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक झाल्याचेही समोर आली आहे.या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे नैराश्याने ग्रासलेल्या तरुणाला पाय धुतलेले पाणी प्यायला देत दीड लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा प्रकार उघडकीस आणला आहे. तरुणाची फसवणूक करणाऱ्या महिलेला तिच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. वृषाली संतोष ढोले असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. ही महिला कन्सल्टन्सीच्या नावाखाली भोंदूगिरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाषाण परिसरात राहणाऱ्या २३ वर्षाच्या तरुणाने तिच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली होती.
स्पर्धा परीक्षांतील अपयशामुळे या तरुणाला नैराश्य आले होते. सोशल मीडियावरील जाहिरात पाहून तो उपचारांसाठी वृषाली ढोले हिच्याकडे गेला. त्यानंतर त्याच्या समस्या अतींद्रिय शक्तीद्वारे ओळखल्याचा दावा महिलेने केला. इतकेच नाहीतर तुझे आयुष्य केवळ ३० वर्षापर्यंत आहे असे सांगून तिने तरुणाला वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा करायला भाग पाडले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here