यावलला सकल धनगर जमातीचे ‘रास्ता रोको’ आंदोलन
साईमत/यावल/प्रतिनिधी :
धनगर जमातीला अनुसूचित लजमाती (ST) चे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासन निर्णय काढण्याच्या अनुषंगाने यावल येथे सोमवारी, २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भुसावळ टी पॉईंटवर ‘रास्ता रोको’ आंदोलन शांततेच्या मार्गाने पोलीस बंदोबस्तात करण्यात आले. रास्ता रोको आंदोलन करीत यावल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
आत्तापर्यंत अनेक सरकारांनी धनगर जमातीची केवळ समित्या, अहवाल आणि अभ्यास करून बऱ्याच वेळा दिशाभूल केली असल्याने जमातीत अजूनही सरकार केवळ देखावा अथवा वेळ काढूपणा तर करत नाही ना अशा भावना येऊ लागल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाने गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करून शासन निर्णय जारी करावा, असे शासनाकडे पत्राद्वारे कळवावे. धनगर जमातीच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने आवश्यक निर्णय घेऊन न्याय देण्याची कृपा करावी, असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर रमेश पाचपोळे, रवींद्र कुवर यांच्यासह २९ समस्त धनगर बांधवांच्या स्वाक्षरी आहे.