बहापुरातील अवैध दारूबंदीसाठी महिलांचा ‘एल्गार’

0
38

मलकापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील बहापुरा गावात अवैध दारू विक्री सुरू आहे. यासंदर्भात वेळोवेळी तक्रार केल्यानंतरही दारू विक्री बंद होत नसल्याने अखेर बहापुरा येथील ग्रामस्थांसह महिलांनी महिला सरपंच पल्लवी देविदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय गाठले. दारूबंदी करण्यासंदर्भात तक्रारवजा निवेदन सादर केले.
अनेक नागरिकांसह महिलांनी दारू विक्रेत्यांना समजावायचा प्रयत्न केल्यास दारू विक्रेते अरेरावीची भाषा करतात. आमचे कुणीच काही करू शकत नाही, असे राजरोसपणे सांगतात. अशा सर्व दारू विक्रेत्यांच्या त्रासाला कंटाळून गावातील सर्व रणरागिनी महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी यांच्या कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवत तक्रार वजा निवेदन दिले. बहापुरा येथील अवैध दारू विक्रेत्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास लोकशाही पध्दतीने आंदोलनासह आमरण उपोषण करण्याचा इशारा उपस्थित महिलांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी सरपंच पल्लवी चव्हाण, उपसरपंच सुरेश उमाळे, सदस्य अश्विनी वाकोडे, वच्छला गोळे, रूपा इंगळे, इंद्रावती इंगळे, कस्तुरा इंगळे, कविता इंगळे, रेणुका झनके, आशा कोंगळे, शिला झाल्टे, निर्मला पवार, सीता निकम, सुशिला झनके, कुसुम अवसरमोल, कस्तुरा इंगळे, कस्तुरा धुरंदर, सुसाबाई झनके, रमा इंगळे, चंद्रप्रभा वानखेडे, देविदास चव्हाण, रवींद्र वाकोडे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here