Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»पत्नीची हत्या; वेल्हाळा शिवारातून पती फरार
    क्राईम

    पत्नीची हत्या; वेल्हाळा शिवारातून पती फरार

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 23, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पत्नीची हत्या; वेल्हाळा शिवारातून पती फरार

    भुसावळ (प्रतिनिधी)-

    तालुक्यातील वेल्हाळा शिवारात दारूच्या नशेत पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २३ मार्चरोजी पहाटे समोर आली असून संशयित आरोपी पती अजीज सलीम शेख (वय ३३) हा घटनास्थळावरून पसार झाला आहे.

    विल्हाळा शिवारातील गट क्र. ६५१ मध्ये किशोर पाटील (रा. सुसरी) यांच्या मालकीच्या विटभट्टीवर परळी वैजनाथ ( जि. बीड) येथील नियाजउद्दीन शेख मन्सूर कुटुंबासह कामासाठी आले. त्यांच्यासोबत मुलगी सना आणि जावई अजीज हे चार मुलांसह विटा तयार करण्याचे काम करीत होते. सर्व कुटुंब एकाच परिसरात पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहत होते. अजीज याला दारूचे व्यसन असल्याने तो रोज रात्री पत्नीशी भांडण करीत असे. शनिवारी रात्रीही दारूच्या नशेत तो घरी आल्यावर पत्नी सना (वय २५)ला शिवीगाळ करू लागला. शेजारी राहणाऱ्या सासूने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. जेवणाचा आग्रह केल्यानंतर अजीज व सना मुलांसह खोलीत झोपायला गेले.

    रविवारी पहाटे कामासाठी उठवायला गेल्यानंतर खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा उघडताच सासू आणि इतर मजुरांनी पाहिले तेव्हा सना रक्तबंबाळ अवस्थेत मृत पडल्याचे आढळले. तिच्या डोळ्यातून आणि नाकातून रक्त येत होते गळ्यावर व्रण असल्याने गळा आवळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सना शेख हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, गळा दाबल्याचा संशय असल्याने शवविच्छेदन अहवालानंतर हत्या कशी घडली याचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.

    घटनेनंतर पती अजीज फरार झाला असून त्याच्यावरच पत्नीच्या हत्येचा संशय व्यक्त होत आहे. मृत सना हिचा भाऊ अजहर शेख मन्सूरच्या तक्रारीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अजीज शेख याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    घटनेची माहिती मिळताच सपोनि जनार्धन खंडेराव, पो.कॉ. सुकराम सावकारे, मनोहर बनसोडे, भुषण माळी, साहेबराव कोळी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. अजीज शेख याला अटक करण्यासाठी पोलीस पथके शोधमोहीम राबवत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026

    Malegaon : मालेगाव महापालिकेतील लिफ्ट कोसळली

    February 7, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.