Director General of Police Medal : विनोद पाटील यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

0
32

विनोद पाटील यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

जळगाव (प्रतिनिधी) –

सावदा पोलीस ठाण्याचे हवालदार विनोद बळीराम पाटील यांना त्यांच्या १५ वर्षांच्या प्रामाणिक आणि उत्कृष्ट सेवेसाठी जिल्हा पोलीस विभागातर्फे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. कर्तव्यदक्षता, उत्कृष्ट कार्यप्रदर्शन आणि निष्कलंक अभिलेख यामुळे त्यांनी हा पुरस्कार पटकावला आहे.

हा सन्मान सोहळा महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान विनोद पाटील यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि विशेष सत्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. विनोद पाटील यांनी सावदा पोलीस ठाण्यासह रावेर पोलीस ठाण्यात ७ वर्षे सेवा देताना कर्तव्यनिष्ठेने आणि कार्यकुशलतेने सर्वांचे मन जिंकले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल सावदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पीएसआय बशीर तडवी यांच्यासह कर्मचारीवृंदाने अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here