हांगझोऊ : वृत्तसंस्था
२०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विद्या रामराजने इतिहास रचला आहे. तिने महान ॲथलीट पीटी उषाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विद्याने ४०० मीटरची शर्यत ५५.४३ सेकंदात पूर्ण केली. यासह तिने महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत पीटी उषाच्या ३९ वर्षीय राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली. १९८४ मध्ये पीटी उषाने ही शर्यत ५५.४२ सेकंदात पूर्ण केली होती. आता विद्यानेही हे केले आहे. यापूर्वी विद्याचा सर्वोत्तम विक्रम ५५.४३ सेकंद होता. ती बहरीनच्या अमीनत ओये जमालसह हीट १ मधून थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरली.
सहभागी होताना विक्रम केला
विद्याची बहीण नित्याही आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत एकत्र भाग घेणाऱ्या विद्या आणि नित्या या भारतातील पहिल्या जुळ्या बहिणी आहेत. नित्याचा जन्म विद्याच्या एक मिनिट आधी झाला होता. त्यांच्या वडिलांनी एकदा त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कोईम्बतूरच्या रस्त्यावर ऑटो-रिक्षा चालवली. नित्या महिलांच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत तर विद्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत भाग घेते.