ज्येष्ठ पत्रकार डॉ .डी .बी .जगत्पुरिया यांचा तापी -पूर्णा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

0
10

संभाजीनगर ः प्रतिनिधी
विख्यात कवी, समीक्षक, ज्येष्ठ पत्रकार डी. बी. जगत्पुरिया यांचा खामगाव येथे शिव -बाल- किशोर -युवा साहित्य संमेलनात तापी- पूर्णा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला .सन्मान चिन्ह,सन्मानपत्र, शाल, गुच्छ व रोख रक्कम प्रदान करून संमेलनाध्यक्ष लता गुठे, पविणा शहा, डॉ.शिवचरण उज्जैनकर, डॉ. प्रवीण क्षीरसागर, इतिहासकार संशोधक किशोर वानखेडे, श्रीमती ज्योती ठाकरे यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
उज्जैनकर फाउंडेशनचा हा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डी .बीं. नी संयोजक व उपस्थितांचे कृतज्ञता पूर्ण आभार आपल्या मनोगतात मांडले .ते म्हणाले की, हा मानाचा पुरस्कार “ ही अक्षरेच आता सारे प्रमाण माझे’ या जिद्दीने लेखन करायची प्रेरणा देत राहील. श्री. जगतपुरिया यांचे डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ.मिलिंद बागुल,न्यायमूर्ती डी.आर.शेळके, कविवर्य जगदीश देवपूरकर, डॉ. अशोक शिरसाट,डॉ.बलराज पांडवे,फिरत्या चाकावरती कार निंबाजी हिवरकर, डॉ. शिवाजी हुसे, सतीष तशक यांच्यासह अनेकांनी अभिनंदन
केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here