दुबई : वृत्तसंस्था
आयपीएल २०२४ च्या लिलावात प्रीती झिंटाचा संघ पंजाब किंग्जकडून एक चूक झाली.ज्या खेळाडूला संघात घ्यायचे नव्हते त्यांच्यावर संघआने बोली लावली. शशांक सिंग आयपीएल २०२४ मध्ये त्या संघाचा एक भाग असेल,ज्यांना त्याला लिलावात खरेदी करायचे नव्हते.वास्तविक, आयपीएलच्या पुढील मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत पार पडला. यादरम्यान पंजाब किंग्जने चुकून ३२ वर्षीय अष्टपैलू शशांक सिंगला खरेदी केले तर त्यांना १९ वर्षीय शशांक सिंगला खरेदी करायचे होते. दोघांचे नाव आणि मूळ किंमत (२० लाख) सारखीच असल्याने हा गोंधळ झाला.
त्यावेळी पंजाब किंग्जच्या लिलावाच्या टेबलवर प्रीती झिंटा, नेस वाडिया, प्रशिक्षक संजय बांगर आणि ट्रेव्हर बेलिस उपस्थित होते. फ्रँचायझीला चूक लक्षात येताच त्यांनी पहिल्यांदा लिलाव करणारी महिला लिलावकर्ता मल्लिका सागर यांना माहिती दिली आणि खेळाडूला परत करण्याची तसेच पर्समधील पैसे परत करण्याची मागणी केली, परंतु तसे होऊ शकले नाही. मल्लिका सागरने सांगितले की, शशांक सिंगवर एकमेव बोली तुमच्या बाजूने आली होती आणि हातोडाही खाली पडला होता. नियमानुसार, खेळाडूला विकल्यानंतर त्याला अशा प्रकारे सोडणे शक्य नाही. हे सर्व संभाषण टीव्हीवर लाईव्ह चालू होते.
परिणामी पंजाब किंग्जला त्यांच्या संघातील चुकीच्या खेळाडूवर समाधान मानावे लागले तर या कराराचा फायदा छत्तीसगडकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या शशांक सिंगलाही झाला. फ्रँचायझी त्याला विकत घेऊ इच्छित नाही हे माहीत असूनही, शशांक सिंग आयपीएल २०२४ मध्ये पंजाब किंग्जचा भाग असेल.शशांक याआधी सनरायझर्स हैदराबादकडूनही खेळला आहे. शशांकच्या नावावर आयपीएल २०२२ च्या १० सामन्यांमध्ये ६९ धावा आहेत. तो वेगवान गोलंदाजीही करतो.त्याच्याकडे १५ प्रथम श्रेणी, ३० लिस्ट ए आणि ५५ टी-२० सामन्यांचा अनुभव आहे, ज्यामध्ये त्याने तीन शतकेही झळकावली आहेत.
पंजाब किंग्जचा संघ:
मिनी लिलावात खरेदी केलेले खेळाडू: हर्षल पटेल (११.७५ कोटी), रिले रूसो (८ कोटी), ख्रिस वोक्स (४.२० कोटी), तनय थियागराजन (२० लाख), प्रिन्स चौधरी (२० लाख), विश्वनाथ प्रताप सिंग (२० लाख), शशांक सिंग (२० लाख), आशुतोष शर्मा (२० लाख) उर्वरित खेळाडू : शिखर धवन, सॅम केन, लियाम लिव्हिंगस्टोन, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, प्रभसिमरन सिंग, ऋषी धवन, सिकंदर रझा, हरप्रीत सिंग, अथर्व तायडे, विद्वत कावेरप्पा, शिवम सिंग, जितेश शर्मा.