Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या जमिनीचा होणार लिलाव
    मुंबई

    अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या जमिनीचा होणार लिलाव

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 22, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    काही दिवसांपूर्वी मृत्यूच्या बातमीने चर्चेत आलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला राज्य सरकार आणखी एक दणका देणार आहे. रत्नागिरीतील मुंबके येथील दाऊदच्या मालकीची जमीन आहे. त्याच्या या जमिनीचा पुढील महिन्यात ५ जानेवारी २०२४ रोजी लिलाव करण्यात येणार आहे.
    भारतातून फरार असलेला आणि १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम कासकर हा मूळचा कोकणातील आहे. रत्नागिरीतील मुंबके हे दाऊदचे मूळ गाव आहे. दाऊदने तस्करी, खंडणी आणि इतर बेकायदेशीरमार्गाने अमाप संपत्ती जमवली. त्यातून त्याने काही मुंबईसह विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या होत्या. आता दाऊदच्या याच मालकीच्या जागांचा लिलाव करण्यात येणार आहे.
    रत्नागिरीतील मुंबके येथील डॉन दाऊद इब्राहिम याच्या चार जागांचा लिलाव होणार आहे. यामध्ये चार शेत जमिनींचा समावेश आहे. जवळपास २० गुठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. चार जमिनीपैकी एका जमिनीची किंमत ९ लाख ४१ हजार २८० रुपये इतकी आहे. तर दुसऱ्या शेतजमिनीची अंदाजे किंमत ही ८ लाख ८ हजार ७७० रुपये इतकी आहे. मुंबके येथील जमिनींच्या लिलावाबाबत २१ नोव्हेंबर २०२३ रोजी लिलावाबाबत नोटीस काढण्यात आली होती. दाऊद इब्राहिम कासकरचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुंबके हे आहे. या गावात त्याचा बंगला व आंब्याची बाग तर लोटे आणि खेड शहर अशा सहा ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता होत्या.

    या आधीदेखील मालमत्तेचा लिलाव
    तीन वर्षांपूर्वीदेखील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटे येथील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावून हा लिलाव जिंकला होता. स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स ॲक्ट अंतर्गत हा ऑनलाइन लिलाव झाला होता. काते यांनी १ कोटी १० लाख रुपयांना मालमत्ता लिलावात घेतली. या जागेची किंमत ६१ लाख ४८ हजार १०० रुपये निश्चित करण्यात आली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.