प्रेमविवाहाच्या रागातून मामाचा भाचीवर हत्याराने वार
जळगाव (प्रतिनिधी)-
लहानपणापासून सांभाळ केलेल्या भाचीने पळून जावून प्रेमविवाह केल्याने संतप्त झालेल्या मामाने केळी कापणीच्या शस्त्राने (बख्खी) तिच्यावर हल्ला केल्याची घटना यावल तालुक्यातील पिंप्री गावात घडली भाची गंभीर जखमी झाली आहे.
यावल तालुक्यात पिंप्री गावात चेतन कोळी यांच्यासोबत लव्ह मॅरेज करून वैष्णवी तायडे (वय 18 )आली होती. स्वप्निल सपकाळे याच्या घरात ती होती. शनिवारी वैष्णवी तायडेचा मामा उमाकांत कोळी (रा. पाडळसा ) आला आणि त्याने बक्खी या हत्याराद्वारे भाचीच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात ती व वैशाली सपकाळे ही देखील जखमी झाली.
नागरिकांनी दोन्ही महिलांची त्याच्या तावडीतून सुटका करून रुग्णालयात आणले. नागरिकांनी उमाकांत कोळी याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.