जळगाव : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी जल्लोषात झाला. कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थनी होते. जिल्हास्तरावरून विद्यापीठ स्तरावरील संशोधन स्पर्धेसाठी ३४७ प्रवेशिकांची निवड करण्यात आली होती. ११ डिसेंबर रोजी पहिल्या फेरीत सादरीकरण केल्यानंतर १५२ प्रवेशिकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. बुधवारी विद्यापीठाच्या विविध सहा प्रशाळांमध्ये या प्रवेशिकांचे सादरीकरण झाले. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.
पारितोषिक वितरण प्रसंगी बोलतांना अशोक गाडे म्हणाले की, निरीक्षण, परीक्षण आणि सर्मपण हे गुण अविष्कार निर्मितीसाठी आवश्यक आहे. श्री. गाडे यांनी यावेळी स्वत:चे अनुभव विषद केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. माहेश्वरी यांनी संशोधक विद्यार्थ्यांसमोर नवीन प्रयोग करणाऱ्या व्यक्ती आणण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. प्रा. एस.टी. इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी स्पर्धेचे समन्वयक प्रा.जे.व्ही. साळी यांनी स्पर्धेचा आढावा सादर केला.यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे, प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे प्रगतीशिल शेतकरी अशोक गाडे यांची उपस्थिती होती. याशिवाय कुलसचिव डॉ. विनोद पाटील, स्पर्धेचे समन्वयक प्रा.जे.व्ही. साळी, उपसमन्वयक डॉ. जितेंद्र नारखेडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे उपस्थित होते. परीक्षकांच्यावतीने प्रा. अतुल शिरखेडकर यांनी तर सहभागींच्या वतीने हिमानी महाजन (जळगाव) यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी केले. डॉ. व्ही.एम. रोकडे यांनी आभार मानले.
विविध गटांतील निकाल
मानव्य विद्या, भाषा, आणि ललित कला शाखा
पदवी गटात पोस्टर प्रथम: शिरपुर आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा निकीता महाले व गायत्री धनगर , पोस्टर द्वितीय : पाचोरा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या भारती कोळी व योगश्वरी पाटील, पोस्टर तृतीय : नंदुरबार एन.टी.व्ही.एस. शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चारूशिला पाटील
पदव्युत्तर गट पोस्टर प्रथम : शिरपूर आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च जितेंद्र भामरे व कौस्तुभ चौधरी, मोड्यूल द्वितीय : शिक्षणशास्त्र विभाग, कबचौउमवि दिपाली पाटील व पुजा भोई पोस्टर तृतीय : शिरपूर आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसचखुशी जयस्वाल व दिव्या चौधरी,
पदव्युत्तर-पदवी गट : पोस्टर प्रथम जळगाव संगणकशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि वृषाली सोळंके, पोस्टर द्वितीय:संरक्षणशास्त्र विभाग, कबचौउमवि विलास कुमावत यांना प्राप्त झाले आहे.