एशिया कप-२०२३ वर कोरोनाचे सावट दोन खेळाडूंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

0
10

कोलंबो ः वृत्तसंस्था

येत्या ३० ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सरुवात होणार असून १७ सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यंदा पाकिस्तान या स्पर्धेंचे आयोजन करत आहे. हायब्रीड मॉडेलवर ही स्पर्धा होत असून काही सामने पाकिस्तानात तर काही सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.स्पर्धेतला पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळदरम्यान मुलतानमध्ये खेळवला जाणार आहे पण स्पर्धा सुरु होण्याआधीच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. एशिया कप स्पर्धेवर कोरोनाचे सावट पसरले
आहे.
स्पर्धेवर कोरोनाचे सावट
एशिया कप स्पर्धेला काही दिवसांचा अवधी बाकी असतानाच श्रीलंकेतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीलंका क्रिकेट संघाचे दोन खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.सलामीचा फलंदाज अविष्का फर्नांडो आणि विकेटकिपर-फलंदाज कुसल परेरा या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.
अविष्का फर्नांडोला याआधीही कोरोनाची लागण झाली होती.गेल्या वर्षी झिम्बाब्वेविरुध्दच्या एकदिवसीय मालिकेआधी अविष्का फर्नांडो कोव्हिड पॉझिटिव्ह आढळला होता.बूस्टर डोस घेतल्यानंतरही अविष्काला कोरोनाची लागण झाली होती.कुसल परेराही दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या क्रिकेट मालिकेआधी कुसल परेराला कोरोनाची लागण झाली
होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here