दोन नव्या एक्सप्रेस रेल्वेगाड्यांची आज सुरूवात
जळगाव ( प्रतिनिधी)
एमजीआर चेन्नई सेंट्रल ते भगत की कोठी, तर पुण्यातील हडपसर-जोधपूर एक्सप्रेस या दोन नवीन रेल्वे गाड्या सुरु होत आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते नव्या या ट्रेनचा शुभारंभ होत आहे. यातील एक गाडी जळगाव आणि भुसावळमार्गे धावणार आहे.
गाडी क्र २०६२५ एमजीआर चेन्नई ते भगत की कोठी, जोधपूर (राजस्थान) पर्यंत आठवड्यातून पाच दिवस धावेल. २०६२५ चेन्नई ते जोधपूर (भगत की कोठी) ही गाडी दर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी चेन्नईहून संध्याकाळी ७:४५ वाजता निघेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १२:१५ वाजता जोधपूरला पोहोचेल. २०६२६ भगत की कोठी (जोधपूर) ते चेन्नई ही गाडी दर रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी ५:३० वाजता भगत की कोठी येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११:१५ वाजता चेन्नईला पोहोचेल. या गाडीला भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकांवर थांबा असणार असल्यामुळे जळगावकर प्रवाशांची सोय होणार आहे.
चेन्नई सेंट्रल येथून निघाल्यावर दुसऱ्या दिवशी भुसावळ रेल्वे स्थानकांवर दुपारी ४ वाजून ५ मिनिटाने पोहोचले. जळगावला ती दुपारी ४ वाजून ४७ मिनिटाला पोहोचले. ही ट्रेन भगत की कोठी, जोधपूर येथून निघाल्यावर जळगावला दुसऱ्या दिवाशी रात्री १२.२५ मिनिटाने पोहोचले. तर भुसावळला १२.५० मिनिटाने पोहोचेल.
चेन्नई, सुलुरपेट्टा, गूतूर, नेल्लोर, औंगोले, विजयवाडा, खम्मम, वारंगल, बल्हारशाह, चंद्रपूर, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वडोदरा, साबरमती, महेसाणा, राणीवाडा, बल्हरिवाडा, बल्हाड, बल्लापूर, जल्दी, बडनेरा कोठी.
या ट्रेनमध्ये २२ कोच असतील – ६ सेकंड स्लीपर, ४ थर्ड एसी, ४ थर्ड एसी इकॉनॉमी, २ सेकंड एसी, ४ जनरल, १ पॉवरकार आणि १ गार्ड कोच.