मुक्ताईनगर : प्रतिनिधी
सराईत गुन्हेगार तपासणीसाठी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी वेळोवेळी नाकाबंदी लावली होती. त्यामुळे येथील सुज्ञ नागरिकांनी गोपनीय माहितीवरून पोलीस कॉन्स्टेबल धर्मेंद्र ठाकूर आणि रवींद्र धनगर यांना सांगितले की, मुक्ताईनगर शहरात एक माया नावाचा व्यक्ती हा गावठी कट्टा आपल्याजवळ बाळगत आहे. त्यातून एखादा गंभीर गुन्हा होऊ नये म्हणून धर्मेंद्र ठाकूर, रवींद्र धनगर यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकारी पी.आय.नागेश मोहिते यांना माहिती दिली. तेव्हा त्यांनी लगेच आदेश देऊन पी.एस.आय. प्रदीप शेवाळे, मोतीलाल बोरसे, प्रशांत चौधरी, यांची टीम पाठवून शिताफीने रवींद्र उर्फ माया तायडे याला ताब्यात घेऊन ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर वीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा त्याच्याकडे आढळून आला. त्यासंदर्भात चौकशी केल्यावर हा गावठी कट्टा नशिराबाद येथील युवराज कडू होंडाळे याच्याकडून घेतला असल्याचे सांगितले. आरोपीच्या सांगण्यावरून लागलीच त्यांनी नशिराबाद येथील युवराज होंडाळेला ताब्यात घेतले. मयूर राजपूत याच्या मोबाईलद्वारे युवराज होंडाळे यांना १९ हजार रुपये पाठविल्याचे सांगितले. रवींद्र उर्फ माया तायडे आणि युवराज कडू होंडाळे या दोघांना ताब्यात घेतले आहे. मयूर राजपूत हा अद्यापही फरार आहे.
ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. प्रदीप शेवाळे, पी.एस.आय. राहुल बोरकर, लीलाधर भोई, धर्मेंद्र ठाकूर, मोतीलाल बोरसे, सुरेश पाटील, रवींद्र धनगर, प्रशांत चौधरी, राहुल बेहनवाल यांनी केली.