Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नाशिक»कुंभमेळ्यात नाशिक, त्र्यंबकेश्वरचा प्रवास सुखद होणार महामार्ग विस्तारीकरण, रस्ता मजबुतीकरणासाठी २२७० कोटी
    नाशिक

    कुंभमेळ्यात नाशिक, त्र्यंबकेश्वरचा प्रवास सुखद होणार महामार्ग विस्तारीकरण, रस्ता मजबुतीकरणासाठी २२७० कोटी

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 13, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कुंभमेळ्यात नाशिक, त्र्यंबकेश्वरचा प्रवास सुखद होणार
    महामार्ग विस्तारीकरण, रस्ता मजबुतीकरणासाठी २२७० कोटी

    नाशिक (प्रतिनिधी)–

    सिंहस्थ कुंभमेळ्यात कोणत्याही भागातून रस्ते मार्गाने नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांना सुखद व जलद प्रवासासाठीची तयारी प्रशासनाने चालविली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे सहापदरीकरण, कॉक्रीटीकरण, नाशिक-दिंडोरी-वणी रस्त्यासह अन्य राज्य मार्गांचे मजबुतीकरण, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहराच्या सभोवताली वर्तुळाकार रस्त्याचे जाळे विणले जाणार आहे. या कामांसाठी २२७० कोटींची तजविज अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

    २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यातही भाविक उत्स्फुर्तपणे सहभागी होतील, हे गृहीत धरून नियोजनात व्यापक फेरबदल केले जात आहे. तयारीला कालावधी कमी असल्याने दीड ते दोन वर्ष लागणारी कामे तातडीने सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी म्हटले आहे. रस्ते, पूल, घाट व तत्सम कामांना जास्त वेळ लागतो . अर्थसंकल्पात नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना मान्यता देऊन तरतूद करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने ७५९.२५ किलोमीटर रस्ते व पुलांची ५२ कामे प्रस्तावित केलेली आहेत. त्यास तीन हजार ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महत्वाची कामे अर्थसंकल्पात समाविष्ट झाल्याचे सांगितले जाते. या व्यतिरिक्त महापालिकेने शहरात साडेतेरा किलोमीटरचे १७ नवीन रस्ते प्रस्तावित केले असून १८८ किलोमीटर जुन्या रस्त्यांच्या सुधारणांचे नियोजन आहे.

    त्र्यंबकेश्वर-नाशिक या ३० किलोमीटर मार्गाचे सहापदरीकरण व कॉक्रिटीकरणास (३५० कोटी) मान्यता मिळाली आहे. यात पालखी मार्गाचाही समावेश आहे. दिंडोरी-वणी-नांदुरी रस्ता रुंदीकरण (१०० कोटी), जानोरी अर्थात नाशिक विमानतळ ते राष्ट्रीय महामार्ग (५० कोटी), पेठ-हरसूल-त्र्यंबकेश्वर-पहिने (२०५ कोटी), त्र्यंबकेश्वर-धोंडेगाव-उमराळे-दिंडोरी-पालखेड-पिंपळगाव (२१५ कोटी) यांच्यासह अन्य वेगवेगळ्या ९१ किलोमीटरच्या रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. बहुतेक रस्ते वर्तुळाकार मार्गाचा भाग आहे. वेगवेगळ्या भागातून रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांना ये-जा करणे सुकर होईल. शिवाय, महामार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांना शहरात येण्याची गरज भासणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Nashik : ५८४ सरपंचांना नाशिक जिल्ह्यात प्रशासक म्हणून अधिकार बहाल, गावात हलवले नवचैतन्य!

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.