ट्रॅक्टर उलटून अपघात: चालकाचा मृत्यू

0
56

ट्रॅक्टर उलटून अपघात: चालकाचा मृत्यू

रावेर (प्रतिनिधी)-

तालुक्यातील अजंदे शिवारात भरधाव ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. रावेर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावदा येथील भीमराव मेढे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर घनश्याम हरणकर (विवरा ) यांच्या माती वाहतुकीच्या कामावर लावण्यात आले होते. चालक विजय तायडे (वय 45) आज विवराहून अजंदेकडे वेगाने जात असताना पांडुरंग पाटील यांच्या शेताजवळ नियंत्रण सुटले. ट्रॅक्टर रस्त्याच्या डाव्या बाजूला लोखंडी अँगलला धडकल्याने पलटी होऊन विजय तायडे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती ट्रॅक्टर मालक भीमराव मेढे यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिली अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here