Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»Toyota च्या पॉवरफुल SUV साठी ४ वर्षांचा वेटिंग पीरियड
    Uncategorized

    Toyota च्या पॉवरफुल SUV साठी ४ वर्षांचा वेटिंग पीरियड

    saimat teamBy saimat teamSeptember 11, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     न्यू जनरेशन टोयोटा लँड क्रूजर बरीच चर्चेत असनू डिझाइन-फीचर्सच्या बाबतीत ही कार आकर्षक आहेच, पण सुरक्षेच्या कारणास्तव या दमदार एसयूव्हीच्या पुन्हा विक्री करण्यावर (रीसेल, पुनर्विक्री) कंपनीने बंदी घातली आहे. मात्र, पुन्हा विकणं तर दूरच पण सध्या ही कार खरेदी करणेही एक मोठा टास्क आहे. कारण, Toyota Land Cruiser च्या अनेक व्हेरिअंटवर वर्षांचा वेटिंग पीरियड सुरू आहे.

    Cars Guide च्या एका रिपोर्टनुसार, कंपनी नेक्स्ट जनरेशन लँड क्रूजरसाठी वेटिंग पीरियड ४ वर्षांपर्यंत वाढवत आहे. रिपोर्टनुसार, सप्लाय चेन अर्थात पुरवठा साखळीतील व्यत्यय यामागे कारण आहे. या एसयूव्हीची डिमांडही खूप जास्त आहे, पण टोयोटाला कम्पोनेंट्स (विशेषत: मायक्रोचिप्स) मिळणे कठीण जात आहे. तथापि, चार वर्षांपर्यंतचा वेटिंग पीरियड काही निवडक व्हेरिअंट्सवरतीच आहे, सर्व नाही असं रिपोर्टमध्ये म्हटलंय.

    न्यू जनरेशन लँड क्रूजरची ‘हाय डिमांड’-

    जपानी वाहन निर्माता टोयोटाने २ ऑगस्ट रोजी न्यू जनरेशन लँड क्रूजरसाठी आपल्या होम मार्केटमध्ये बुकिंगला सुरूवात केली आणि एसयूव्हीला आतापर्यंत २०,००० पेक्षा जास्त ऑर्डर मिळाल्या आहेत. जपानमध्ये जवळजवळ ९० टक्के बुकिंग ZX आणि GR स्पोर्ट ट्रिमसाठी आहेत. इतकी जास्त मागणी आणि चिप्सच्या अभावामुळे या एसयूव्हीसाठी वेटिंग पीरियड खूप वाढला आहे. गेल्या महिन्यातही कंपनी लँड क्रूजरची निर्मिती करू शकली नव्हती आणि या महिन्यातही तीच परिस्थिती असणार आहे.

    इंजिन-फीचर्स-

    नवीन लँड क्रूजर 300 मॉडल TNGA प्लॅटफॉर्मवर आधारित असून यामध्ये V8 इंजिनऐवजी ट्विन-टर्बो V6 नॅचरली एस्पीरेटेड इंजिन दिलं आहे एसयूव्हीच्या एक्सटीरियर प्रोफाइल आणि डिझाइनमध्ये जास्त बदल झालेला नाही, पण केबिनमध्ये मात्र बरेच अपडेट आहेत. याशिवाय यामध्ये वायरलेस चार्जिंग आणि ३६० डिग्री कॅमेरा व एक हेड-अप डिस्प्ले आहे. नवीन लँड क्रूजर दोन इंजिनच्या पर्यायांमध्ये येते. यात ३.५-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V6 पेट्रोल इंजिन आणि ३.३-लिटर ट्विन-टर्बो V6 डिझेल इंजिन मिळतं. पेट्रोल इंजिन ४०९ BHP पॉवर आणि ६५० Nm पीक टॉर्क जनरेट करतं, तर डिझेल इंजिन ३०४.५ BHP पॉवर आणि ७०० Nm पीक टॉर्क जनरेट करतं. दोन्ही इंजिनसोबत १०-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन यूनिट आहे. कारमध्ये १२.३ इंच टचस्क्रीन फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टिम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, हीटेड आणि व्हेटिलेटेड सीट्स, एक डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, अॅडप्टिव क्रूज कंट्रोल असे फीचर्स दिले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025

    Malkapur : मलकापुरात दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लंपास

    December 9, 2025

    Bangladesh Earthquake : बांगलादेश भूकंपाने हादरला: 6 मृत, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली

    November 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.