लग्नाच्या आमिषाने अत्याचार; नंतर लग्नास टाळाटाळ

0
53

लग्नाच्या आमिषाने अत्याचार; नंतर लग्नास टाळाटाळ

अमळनेर ( प्रतिनिधी)-

अमळनेर शहरात राहणारी महिला आठ वर्षांपुर्वी अल्पवयीन असतांना तिला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला. या अत्याचारातून तिने मुलाला जन्म दिला. नंतर आरोपीने लग्नास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. २७ मार्चरोजी दुपारी अमळनेर पोलीस ठाण्यात नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर शहरात पिडीत महिला आपल्या मुलासोबत वास्तव्याला आहे. २०१७ मध्ये पिडीत महिला अल्पवयीन असतांना आरोपी गौरव विजय पाटीलने लग्नाचे आमिष दाखवत पिडीतेला औरंगाबाद जिल्ह्यात नेले. तिकडे तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला. या अत्याचारातून पिडीा गर्भवती झाली. त्यामुळे पिडीतेने गौरवला लग्न करण्याचा आग्रह धरला. पण गौरवने लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पिडीतेने अत्याचारातून मुलाला जन्म दिला. तरीदेखील गौरवने लग्न करण्यास नकार देत जातीवाचक शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली.

अखेर पिडीतेने अमळनेर पोलीस ठाण्यात गौरव पाटील याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून २७ मार्च रोजी दुपारी अमळनेर पोलीस ठाण्यात गौरव पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here