MD drugs : २३ ग्रॅम एमडी ड्रग्ससह भुसावळात तिघांना अटक

0
6

२३ ग्रॅम एमडी ड्रग्ससह भुसावळात तिघांना अटक

जळगाव ( प्रतिनिधी ) –

भुसावळ शहरातून अटक केलेल्या आरोपीच्या घरातून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई डीवायएसपी संदीप गावित व त्यांच्या टीमने केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली.

जळगाव शहरातील शाहूनगर मध्ये शहर पोलीस स्टेशनने टाकलेल्या धाडीमध्ये ड्रग्स जप्त करण्यात आले होते. मुख्य आरोपी सरफराज याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशी मध्ये याकुबचे नाव समोर आले. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आल्यानंतर जळगाव येथे आल्यावर त्याला अटक करून चौकशी केली असता भुसावळ येथील अन्सार भिती, वसीम खान यांची नावे समोर आली.

वसीम खान यांच्या घराची झडती घेतली त्याच्या घरातून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स मिळून आले. या कारवाईमध्ये डीवायएसपी संदीप गावित, एपीआय नाईक, रीडर गायकवाड व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी उपस्थित होती. तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here