उत्तम यश मिळविण्यासाठी कुशाग्र बुद्धिमतेला पर्याय नाही ः डॉ. विवेक काटदरे

0
14

जळगाव : प्रतिनिधी

स्पर्धेच्या युगात प्रत्येकात विविध गुंणकौशल्य असणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक पातळी वेगवेगळी असल्याने विद्यार्थ्यांना जर शैक्षणिक प्रगती साधायची असेल तर त्यांच्या जवळ प्रखर स्मरणशक्ती व एकाग्रता मोठ्या प्रमाणात असणे गरजेचे आहे. त्या अनुसरून विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढावी, त्यांचे महत्व कळावे या उद्देशाने एसडी-सीड तर्फे “स्मरणशक्ती व एकाग्रता विकास” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन नंदिनीबाई वामनराव मुलींचे ज्युनियर कॉलेज, जळगाव येथे
करण्यात आले.
कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विवेक काटदरे हे होते. शक्ती पेक्षा बुद्धी श्रेष्ठ ही म्हण आज पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्यासाठी कुशाग्र बुद्धिमतेला पर्याय नाही. त्यांनी सागितले की, प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक पातळी वेगवेगळी असते. त्यामुळे यश मिळविण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करायला पाहिजे. प्रत्येकामध्ये स्मरणशक्ती उपजत असते. कोणत्याही औषधाने ती वाढविता येत नाही. योग्य प्रकारे तिला वळण देवून तिचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी आपण करू शकतो. अभ्यासाव्यतिरिक्त नोकरी आणि व्यवसाय करतांना सुद्धा तिचा उपयोग होत असतो. स्मरणशक्ती वाढविण्यासोबतच मेडीटेशन, संभाषण कौशल, मूल्य शिक्षण, तसेच भौतिक संपत्ती पेक्षा शारीरिक, अध्यात्मिक, नैसर्गिक, वैचारिक संपत्ती ही मानवी जीवनात किती उपयुक्त आहे यावरही त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. स्मरण होणे म्हणजे आठवणे, वाचलेले, अनुभवलेले, पाहिलेले तसेच ऐकलेले लक्षात राहणे व ते योग्य वेळी आठवणे यालाच “स्मरणशक्ती” म्हणतात. आपले अंतर्मन हे स्मरणशक्तीचे केंद्र आहे. प्रत्येकाच्या मेंदूच्या कार्यक्षमतेनुसार स्मरणशक्ती कमी जास्त असू शकते. स्मरण शक्तीच्या विकासासाठी मनाची एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे.
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी एखादा विषय पूर्ण एकाग्रतेने ऐका किंवा बघा, दररोज व्यायाम, योग, ध्यान करा, रात्री लवकर झोप व सकाळी लवकर उठा, आपला आहार चांगला ठेवावा असे काही महत्वाची सूत्रे त्यांनी सांगितली. हे सर्व जर आपण केले तर आपल्या अंतर्मनाचा भाग जास्तीत जास्त बाह्य मनाच्या पृष्ठभागावर येत असल्याने स्मरणशक्तीचा जबरदस्त विकास होतो असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाला उपप्राचार्य एस. एस. नेमाडे , समन्वयक आर. डी. वराडे , के. व्ही. जंगले, एल. ए. भारंबे, जे. आर. नेमाडे, एल. एस. नारखेडे, जे. एस. कापुरे, ए. ओ. ओहळ, एस. ए. चौधरी, एस. एम. बोडें, एसडी-सीड समन्वयक विरभूषण पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या व महाविद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी-सीड गव्हर्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here