आग लगे बस्तीमें, मस्तराम मस्तीमें,अशी स्थिती

0
13

ठाणे ः प्रतिनिधी

भाजपा नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचा उल्लेख करत केलेल्या एका वक्तव्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. गावितांवर सध्या विरोधकांकडून टीका सुरू आहे. एका भाषणादरम्यान, विजयकुमार गावित म्हणाले, “तुम्ही ऐश्वर्या रायला बघितलेय ना? ती बंगळुरूच्या समुद्राच्या किनारी राहणारी. ती दररोज मासे खायची. बघितले ना तिचे डोळे? तसे तुमचेही डोळे होणार. मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागते, डोळेपण तरतरीत दिसतात. कुणीही बघितले तरी पटवूनच घेणार. आपली त्वचाही चांगली दिसते.” यावेळी गावित यांनी मासे खाण्याचे इतर फायदे, त्यातल्या तेलाचे फायदे सांगितले.
विजयकुमार गावित यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीका सुरू आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही गावितांवर जोरदार टीका केली.जितेंद्र आव्हाड म्हणाले, विजयकुमार गावितांनी आता अभ्यास वर्ग घ्यायला हवेत. त्यांच्याकडे चांगले भरपूर विद्यार्थी येतील. पोरी कशा पटवाव्यात असा त्यांचा सल्ला आहे. मंत्री चांगले सल्ले देत आहेत. राज्यासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांशी, अडचणींशी या सरकारचे काही देणंघेणं नाही. ते आता मंत्री झाले आहेत. याच्यातच ते इतके भयंकर खूश आहेत की, त्यांना महाराष्ट्राशी काही देणंघेणं राहिलेले नाही. आग लगे बस्ती में, मस्तराम मस्ती में, अशी स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here