Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»…तर तुमच्या सोबत ५ आमदारही आले नसते
    राज्य

    …तर तुमच्या सोबत ५ आमदारही आले नसते

    Kishor KoliBy Kishor KoliJanuary 3, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिर्डी : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय शिबीर शिर्डी येथे सुरू आहे. या शिबिरात शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीतून बंड केलेल्या अजित पवार यांच्या गटावर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनीही अजित पवार गटावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. पवार साहेबांना आमदार दबावापोटी सोडून गेले, हे प्रेमापोटी कोणी गेले नाही. जर तुम्ही सत्तेच्या बाहेर असता तर तुमच्या सोबत ५ देखील आमदार आले नसते, पण तुम्ही सत्तेबरोबर आहात, ईडीचा धाक आहे म्हणून तुमच्या बरोबर आमदार आले आहेत. आज इथे जे कार्यकर्ते थांबलेले आहेत ते शरद पवारांच्या विचारांनी थांबलेले आहेत, असा हल्लाबोल शेख यांनी केला आहे.
    अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडताना महेबूब शेख यांनी पुढं म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ५४ आमदार निवडून आले ते फक्त शरद पवार साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून निवडून आलेत. आता काही लोक सांगतात की, साहेबांनी ३८ व्या वर्षी निर्णय घेतला, आम्ही ६० व्या वर्षी निर्णय घेतला. यांनी जर ३८ व्या वर्ष निर्णय घेतला असता तर सरपंच तरी त्यांच्याबरोबर आला असता का? शरद पवार साहेबांनी ३८ व्या वर्षीच्या वेळी निर्णय घेतला त्यावेळी परिस्थिती तशी होती आणि एका वृत्तपत्राला बातमी होती की, हे सरकार जावे ही श्रींची इच्छा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची याला परवानगी होती. त्या परवानगीने घरात कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या हिंमतीवर ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री असायला शरद पवार व्हावे लागते, असा टोला शेख यांनी लगावला आहे.

    पक्षावर दावा केला म्हणून
    कोणी शरद पवार होत नसतो
    महेबूब शेख यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर आजच्या शिबिरात अत्यंत आक्रमकपणे अजित पवार गटाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, नकली फुले केसात माळून शरीरात वसंत येत नसतो, पांढरे केस काळे केले म्हणून कोणी तरुण होत नसतो आणि पक्षावर दावा केला म्हणून कोणी शरद पवार होत नसतो. जर तुम्हाला शरद पवार व्हायचं असेल तर सत्ता गेली तरी बेहत्तर ज्या महामानवाने देशाचे संविधान लिहिले त्या महामानवाचे नाव मी मराठवाडा विद्यापीठाला देईल हा निर्णय घ्यावा लागतो, तुम्हाला जर शरद पवार व्हायचे असेल तर मंडळ आयोगाच्या विरोधात निघालेली कमंडल यात्रा निघालेली असताना देखील मंडल आयोगाची अंमलबजावणी करून २७ टक्के ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचे काम तुम्हाला करावे लागते, म्हणून मला तुम्हा सर्व युवकांना एवढंच सांगायचे आहे की, आपल्याकडे काळ कमी आहे आपल्याला सर्वांना पुढचे नऊ महिने प्रत्येक गावात प्रत्येक भूत वर जाऊन सकाळपासून रात्रीपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रत्येक गावागावांमध्ये शाखा तयार करायच्या आहे. शरद पवार साहेबांचे काम कानाकोपऱ्यात पोहोचवायचे आहे आणि यासाठी पुढचे नऊ महिने प्रत्येकाने माझ्यासहित झोकून देऊन आपल्याला काम करायचे आहे,” असं आवाहन शेख यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.