Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»भारत-पाकिस्तानच्या दोन अव्वल खेळाडूंनी दिला प्रेमाचा, मैत्रीचा संदेश
    क्रीडा

    भारत-पाकिस्तानच्या दोन अव्वल खेळाडूंनी दिला प्रेमाचा, मैत्रीचा संदेश

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 28, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुडापेस्ट (हंगेरी) : वृत्तसंस्था

    भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक ऍथेलिटिक्स चॅम्पियशनशीप स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरजची सुवर्ण धाव कायम आहे.जागतिक ऍथेलिटिक्स चॅम्पियशनशीपमध्ये अव्वल क्रमांक पटकावल्यावर नीरजने जल्लोष सुरू केला. नीरजला सुवर्ण मिळताच राष्ट्रगीताला सुरुवात झाली. यादरम्यान कॅमेरामनसमोर पोझ देताना कॅमेऱ्यात एक अद्भूत क्षण कैद झाला.
    सुवर्ण पदक जिंकल्यानंतर नीरजने खांद्यावर तिरंगा घेतला. यावेळी त्याने कॅमेऱ्यासमोर फोटोसाठी पोझ दिल्या.तितक्यात नीरजची नजर त्याचा प्रतिस्पर्धी खेळाडू अशरद नदीमकडे गेली. नदीम पाकिस्तानचा खेळाडू असून जागतिक ऍथेलिटिक्स चॅम्पियशनशीपमध्ये त्याने रौप्य पदक पटकावले. अंतिम फेरीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नदीमला नीरजने त्याच्या जवळ बोलावले.नदीम लगेचच नीरजकडे धावला. दोघांनी कॅमेऱ्यासमोर पोझ दिल्या. भारत-पाकिस्तानच्या दोन अव्वल खेळाडूंनी प्रेमाचा, मैत्रीचा संदेश दिला.
    नीरज आणि नदीमच्या फोटोचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. या फोटोत नीरजच्या हातांमध्ये तिरंगा दिसत आहे. त्याच्या शेजारीच नदीम उभा आहे. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे.ऑलिम्पिक स्पर्धेतही नीरजने सुवर्ण पदक पटकावलं होते. त्यावेळी नीरजच्या भाल्याला हात लावल्याने नदीम वादात सापडला. त्यावेळी नीरजने मनाचा मोठेपणा दाखवत त्याची बाजू सावरली.त्यावेळीही नीरजचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले होते.
    बुडापेस्टमध्ये आयोजित जागतिक ऍथेलिटिक्स चॅम्पियशनशीपमध्ये नीरजने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यानंतर त्याने तिरंगा खांद्यावर घेत आनंद साजरा केला. फोटोसाठी पोझ दिल्या. नदीमच्या यशाबद्दल त्याचे कौतुक सुरू आहे. फारशा सुविधा नसतानाही नदीमने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळवले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.