Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगाव महापालिकेची मुदत संपली, आयुक्त गायकवाडांकडे प्रशासकाची सुत्रे
    जळगाव

    जळगाव महापालिकेची मुदत संपली, आयुक्त गायकवाडांकडे प्रशासकाची सुत्रे

    Kishor KoliBy Kishor KoliSeptember 15, 2023Updated:September 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    जळगाव शहर महानगरपालिकेची मुदत संपली असून आता सार्वत्रिक निवडणूक घेणे शक्य नसल्याने राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे महानगरपालिकेच्या आयुक्तांची प्रशासक म्हणून शुक्रवारी दि. १५ सप्टेंबर रोजी एका आदेशाद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता मनपाचे आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकडे प्रशासक म्हणून पदभार आलेला आहे.

    राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका विहीत वेळेत घेणे शक्य होणार नसल्याचे तसेच संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार पालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची असल्यामुळे सदर मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.

    त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार दि. १७ सप्टेंबर रोजी मुदत संपत असलेल्या जळगांव महानगरपालिका येथे प्रशासक पदावर आयुक्त, जळगांव महानगरपालिका यांची नियुक्ती करण्यात येत आहे. आयुक्त, जळगांव महानगरपालिका यांनी महानगरपालिकेची विहीत मुदत संपल्यापासून प्रशासक म्हणून कार्यभार स्विकारावा, असे या आदेशात म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.