यावल : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासंदर्भात अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास यावल तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने आंतरवाली सराटी येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन पाठिंबा दर्शविणारा ठराव मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आला.
अंतरवाली सराटी, जि.जालना गेल्या १६ दिवसांपासून येथे कायमस्वरूपी मराठा आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहे. या उपोषणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. यावल तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, डी.बी.पाटील, वसंत गजमल पाटील, ललित विठ्ठल पाटील, सुनील दशरथ गावडे यांच्यासह समाज बांधवांनी अंतरवाली सराटी येथे जात मनोज जरांगे पाटील यांना तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने जाहीर पाठिंबा दर्शविणारा ठराव देण्यात
दिला.
याप्रसंगी यावल तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजास आरक्षण मिळण्यासंदर्भात वेळोवेळी केलेले आंदोलने तसेच ५ सप्टेंबर रोजी उपोषणास पाठिंबा दर्शविणारी व मराठा, समाजास आरक्षण त्वरित द्यावे, यासाठी शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांनी तालुक्याच्यावतीने ठराव स्वीकारत समाधान व्यक्त केले.