भारतीय क्रिकेट संघाला रिंकूसिंगच्या रुपात मिळाला नवा ‘युवराज सिंग’

0
6

बंगळुरू : वृत्तसंस्था

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात रोहित शर्मा भन्नाट फॉर्मात होता. हा सामना त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय सामन्यांपैकी एक ठरला. एकवेळ भारताची धावसंख्या २२ धावांवर ४ विकेट होती. यानंतर रोहित शर्माने शतक झळकावत संघाला २०० च्या पुढे नेले पण रोहितला रिंकू सिंगची साथ मिळाली नसती तर हे शतक झळकावता आले नसते. फिनिशरच्या भूमिकेत असलेल्या रिंकूने तो भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार का आहे, हे दाखवून दिले. दडपणाखाली त्याने डाव तर सांभाळलाच पण फिनिशरची भूमिकाही बजावत शानदार षटकार मारले.
रिंकू सिंग जेव्हा क्रीजवर आला तेव्हा रोहित शर्मा दबावाखाली होता. चेंंडू त्याच्या बॅटवर येत नव्हता. सिंगल घेण्यासाठीही त्याला संंघर्ष करावा लागत होता पण रिंकूने कर्णधारावर दडपण येऊ दिले नाही.तो येताच त्याने सतत स्ट्राईक रोटेट करत राहिला आणि संधी मिळेल तेव्हा चौकारही मारले. त्यामुळे धावगती भारताच्या बाजूने राहिली आणि रोहित शर्मालाही सेट होण्याची संधी मिळाली. मग त्यानेही आपली शानदार खेळी खेळायला सुरूवात केली.
रिंकू सिंग हा फिनिशर असला तरी तो आधुनिक टी-२० फलंदाजांपेक्षा खूपच वेगळा आहे. तो फरफेक्ट क्रिकेटिंग शॉट्ससह धावा करतो. स्लॉग करण्याऐवजी ‘व्ही’मध्ये खेळण्यावर त्याचा जास्त भर आहे.चेंडू येण्यापूर्वीच कोणता शॉट खेळायचा याचा विचार तो करून ठेवत नाही.चेंडू आल्यानंतर तो आपला शॉट खेळतो, त्यामुळेच गोलंदाजांना रिंकूला बाद करणे कठीण जाते.प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ५८ च्या आसपास आहे. त्यामुळे कठीण विकेटवरही रिंकू हुशारीने फलंदाजी करू शकतो. फिनिशर असूनही टीम इंडियाला गरज असताना त्याने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले.
तीन षटकारांसह शानदार फिनिश
भारतीय डावातील शेवटच्या तीन चेंडूंवर रिंकू सिंगने तीन षटकार ठोकले.त्यामुळे अखेरच्या षटकात संघाला २१२ धावांपर्यंत मजल मारता आली. रिंकूने ३९ चेंडूंच्या खेळीत ६ षटकार आणि २ चौकार लगावले. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सहाव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा खालच्या फळीत फलंदाजी करणाऱ्या कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च
धावसंख्या आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here