लखनऊ ः वृत्तसंस्था
लग्नसोहळ्यातील अनेक धक्कादायक गोष्टी बातम्यांच्या माध्यमातून समोर येतात. नवरा-नवरी नटून थटून आल्यानंतर लग्नमंडपात एखादी विचित्र घटना घडते आणि पाहुण्यांनाही धक्का बसतो.असाच एक भयंकर प्रकार उत्तर प्रदेशच्या बरेली येथे घडला आहे.लग्नाची सर्व तयारी झाली असताना नवरी लग्नमंडपात आली आणि नवऱ्याची वाट बघतच राहिली. कारण नवऱ्याने चक्क त्याच्या मेहुणीला पळवून नेले आणि नवरीला याचा पत्ताही लागला नाही.
ही भयानक घटना बरेलीच्या नवाबगंज येथे घडली. नवऱ्या नवरीच्या बहिणीला पळवून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नवरा-नवरीचे लग्न दोघांच्या आणि कुटुंबाच्या परवानगीनेच ठरले होत परंतु नवरीच्या बहिणीशी नवऱ्याचे अफेअर असल्याचे लग्नमंडपात घडलेल्या प्रकारानंतर समोर आले अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.नवऱ्याने लग्नमंडपाच्या वेशीजवळ येताच मेव्हणीला पळवून नेले. त्यामुळे पाहुण्यांसह नवरीला या धक्कादायक प्रकाराबाबत कळलेच नाही. नवऱ्याने बहिणीसोबत असा भयंकर प्रकार केल्याने नवरीच्या पायाखालची जमिनच सरकली.