जालना : वृत्तसंस्था
मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता पुन्हा एकदा आंदोलन उभे राहिले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरू असून गेल्या सात दिवसांपासून त्यांनी उपोषणही पुकारले आहे. उपोषणाचा आजचा सातवा दिवस असताना त्यांनी सराकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
दरम्यान,या मराठा आंदोलनासाठी अनेक राजकीय नेते पुढे आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन अनेक राजकीय नेते मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आहेत. दरम्यान, आज (४ सप्टेंबर) छत्रपती संभाजी नगर बंदची हाक देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेत आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले
आहे.