Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची उद्या विधानसभेत घोषणा करणार
    मुंबई

    मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची उद्या विधानसभेत घोषणा करणार

    Kishor KoliBy Kishor KoliDecember 13, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुबई :प्रतिनिधी

    राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत असून, उद्या शुक्रवारी विधानसभेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत घोषणा होणार आहे. अवकाळी पाऊस संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी घोषणा करणार असल्याचं मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे, या घोषणेनंतर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलास मिळण्याची शक्यता आहे.
    राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यासाठी विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन देखील केले होते. त्यामुळे सरकार मदतीची घोषणा कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना, आता शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत घोषणा केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत.
    मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचं लक्ष?
    आधीच अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच उरल्यासुरल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामासोबतच रब्बीचा हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून गेलं आहे. अशा परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. एकंदरीत या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नुकसान भरपाईची घोषणा केली जाणार आहे. मात्र, ही नुकसान भरपाई किती असणार आह? या घोषणेचं शेतकऱ्यांना किती फायदा होणार आहे?, याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
    विरोधी पक्षनेते विजय
    वडेट्टीवारांचा हल्लाबोल…
    दरम्यान, याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला होता. “शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची ऐपत नाही. शासन आपल्या दारीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जातात, पण शेतकऱ्यांना मात्र सरकार मदत करत नाही. राज्यात बळीराजा प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे. ट्रिपल इंजिन सरकार जनतेच्या या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सरकार झोपले आहे. गेले तीन दिवस विरोधक धान, कापूस, सोयाबीन, संत्रा, द्राक्ष, कांदा प्रश्न उपस्थित करत आहेत. शेतकरी या अधिवेशनाकडे आशा लावून बघत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय विधान सभेतून पळ काढता येणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले होते.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    कलाविश्वावर शोककळा; ‘देवदास’ फेम अभिनेते विजय कृष्णा यांचं निधन, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला निरोप

    March 4, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.