कोलंबो ः वृत्तसंस्था
पाकिस्तानला कोलंंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध २ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.या पराभवासह पाकिस्तानी संघ आशियाई चषक २०२३ मधून बाहेर पडला.या विजयासह श्रीलंंकेने अंतिम फेरीत स्थान पक्के केले आहे. पराभवासोबतच पाकिस्तानला आणखी एक पराभव झाला आहे. वनडे क्रमवारीत त्यांची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. यासोबतच टीम इंडियाने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.
आशिया चषक सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान आयसीसीच्या क्रमवारीत एकदिवसीय संघात नंबर वन होता. याचा दाखला देत पाकिस्तानी दिग्गज आपल्या संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणत होते.आशिया चषकाचा प्रवास संपेपर्यंत पाकिस्तान संघ क्रमवारीत भारतापेक्षा मागे पडला आहे.पाकिस्तानच्या पराभवाचा भारताला क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे.
ताज्या आयसीसी वनडे क्रमवारीत पाकिस्तान संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचे ३१०२ गुण आहेत तसेत ११५ रेटिंग पॉइंट आहेत. टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचे ४५१६ गुण आणि ११६ रेटिंग पॉइंट आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे ३०६१ गुण आणि ११८ रेटिंग पॉइंट आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघही पहिल्या पाचमध्ये आहेत. इंग्लंडचा संघ चौथ्या आणि न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे.आशिया चषकमध्ये अंतिम सामना भारत व पाकिस्तान संघात होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.मात्र श्रीलंकेने शेवटच्याचेंडूवर विजय मिळवित पाकिस्तानच्या स्वप्नावर पाणी फेरले.
श्रीलंकेने पाकिस्तानला
आशिया कपमधून केले बाहेर
शयष्टिरक्षक मोहम्मद रिझवान आणि सलामीवीर अब्दुल्ला शफीक यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने, गुरुवारी आशिया चषक सुपर फोर टप्प्यातील पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात सात विकेट गमावून २५२ धावा केल्या. पाकिस्तानच्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने शेवटच्या चेंडूवर आठ बाद २५२ अशी मजल मारली. मेंडिसने ८७ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह केलेल्या ९१ धावा आणि समरविक्रम (४८) सोबत तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या १०० धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेने विजय मिळवला. श्रीलंकेने गेल्या वर्षी टी-२० फॉरमॅटमध्ये खेळलेली ही स्पर्धा जिंकली होती.