आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याला अटक
पाचोरा (प्रतिनिधी)
तालुक्यातील कुरंगी येथे मनोज सुखदेव पाटील या तरूणाने मध्यरात्री विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठषवली होती. पोलीस स्टेशनला दाखल आधीची तक्रार मागे घेण्यासाठी धमकी देऊन त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेची पाचोरा पोलिसात नोंद करण्यात आली. मनोज पाटील (वय ३३, रा. कुरंगी) यांची पत्नी सरला पाटील हिने ५ मार्च रोजी गावातीलच दीपक आनंदा मोरे याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यामुळे दीपक मोरे वारंवार तक्रार मागे घेण्यासंदर्भात मनोज यास धमकी देत होता. या धमकीमुळे काही दिवसांपासून मनोज पाटील नैराश्यग्रस्त होते. त्यातूनच त्यांनी विष प्राशन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या जाचाला कंटाळून मनोज पाटील याने २४ एप्रिलरोजी मध्यरात्री शेतात जाऊन विष प्राशन केले. आत्महत्येपुर्वी चिठ्ठी लिहून दीपक मोरे त्रास देत असल्याने जीवन संपवित असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहीले होते. पाचोरा पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने दीपक मोरे याला अटक करण्यात आली आहे.