जळगाव : प्रतिनिधी
नुकतेच भारताने चांद्रयान ३ हे अवकाशयान चंद्राच्या दक्षिण भागात सुखरूप पणे उतरवून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.याचा यशोत्सव सुधर्मा संस्थेच्या वतीने येथील विविध झोपडपट्टीतील ५० विद्यार्थ्यांसमवेत “भाऊचे उद्यान” येथे साजरा केला. कार्यक्रम प्रसंगी मराठी विज्ञान परिषदेचे सचिव दिलीप भारंबे उपस्थित होते. त्यांचे स्वागत सुधर्मा चे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी भगवतगीता देउन केले. याप्रसंगी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
दिलीप भारंबे यांनी, न्युटनचा सिद्धांत, दाबाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ३०० पिनांवर एका पायावर उभे राहणे, पाणबुडीत वापरले जाणारे पॅरीस्कोप, भुपृष्ठिय तणावाचे मापन, सेंन्ट्रिफ्युगल फोर्स एनर्जीचा उपयोग, केंद्रगामी ऊर्ध्वगामी बल, उर्जा अक्षयता नियम, तुतारीचा उपयोग करून ध्वनी तिव्रता वाढविणे, आर्किमिडीज सिद्धांत सप्रमाण सिद्ध करणे आदी प्रयोग समजावून देत भारताच्या चांद्रयान मोहिमेची सविस्तर माहिती दिली. एम.जी.एम सायन्स सेंटर औरंगाबाद यांचेकडील चांद्रयान किटचा उपयोग करून त्याची प्रतिकृती विद्यार्थ्यांकडून तयार करवून घेतली सर्वांनी यात सहभाग घेतला.
या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना युवा विज्ञान, विज्ञान खेळ इत्यादी विज्ञान विषयक माहिती ची नवीन पुस्तके सुधर्मा तर्फे सप्रेम भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमास नशिराबाद, सावखेडा, खेडी खुll मन्यारखेडा, तांबापुरा, समतानगर, भिलपुरा, मेहरुण, राजीव गांधी नगर, आंबेडकर नगर येथील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमास सूर्यकांत हिवरकर, दिनकर बाविस्कर, नाना चव्हाण, चौधरीसर, सुनिता बेलसरे, अरुण बेलसरे, अनंत बेलसरे यांनी सहकार्य केले. यशस्वितेसाठी राहुल सोनवणे, नितिन तायडे, शुभम राखपसारे, सुवर्णा मराठे, प्रियंका पवार, गायत्री पाटील आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार सुधर्माचे सहसचिव दिनकर बाविस्कर यांनी मानले.